Posts

Showing posts from June, 2021

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (चित्रकला - शिल्पकला)

  HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ( चित्रकला - शिल्पकला ) - चित्र - शिल्प ही एक दृश्यकला आहे . केवळ डोळ्यांनी पाहणे हे दृश्यकलेचे वैशिष्टय असते . - बिंदू , रेषा , अवकाश , आकार , पोत हे दृश्य कलांचे मूलभूत घटक आहेत . तर प्रमाणबद्धता , तालबद्धता , पुनरूक्ती , गतिमानता , एकात्मता , रचना , तोलबद्धता ही कलातत्वे आहेत . या कलाघटकांची कागदावर विशिष्ट कलातत्वानुसार मांडणी केली जाते तेव्हा त्या द्धिमितीय अवकाशातुन ' चित्र ' निर्माण होते त्याच पद्धतीने त्रिमितीय अवकाशातून ' शिल्प ' निर्माण होत असते . - वास्तुकलेत आकार , चित्रकलेत रंगाकार आणि शिल्पकलेत घनता व अवकाश यांची पुनरूक्ती करून ताल साधला जातो .

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (साहित्य)

  HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (साहित्य) ( यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिना परिक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे मुद्दे तसेच MPSC , UPSC व इतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिसाठी परिपूर्ण अशी माहिती )  - ' साहित्य ' या शब्दाला मराठीत ' वाङ्ममय ' , ' ललित वाङ्ममय ' हे पर्यायी शब्द वापरले जातात . संस्कृतमध्ये 'काव्य' हा शब्द 'साहित्य' या अर्थाने वापरलेला आहे . कथा , कविता , कादंबरी , नाटक , ललित लेख , आत्मचरित्र , प्रवासलेखन , आठवणी यांचा ललित साहित्यात समावेश होतो .  - साहित्य ही एक 'कलात्मक कला' आहे . सौंदर्याचा आविष्कार करणे हे सर्व कलांचे एक समान तत्व आहे . शब्द अथवा भाषा हे साहित्यकलेचे द्रव्य आहे , तर अर्थ हे 'माध्यम' आहे .  - रोजच्या व्यवहारातील भाषा हेच साहित्याचे 'द्रव्य' असले तरी शब्दांच्या जुळणीतून भावनाप्रधान अर्थ व्यक्त करणे , व्यंग्य अर्थ निर्माण करणे हे साधले जाते तेव्हा भाषा ह्या द्रव्याचे साहित्याच्या माध्यमात रुपांतर होते व त्यातून वाङ...